ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
पाडळी देशमुख हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक सुंदर व प्रगतशील गाव आहे. हे गाव मुंबई-नाशिक महामार्गालगत स्थित असून गावाची स्थापना सन १९६६ साली झाली. ग्रामपंचायतीत एकूण ४ पाड्या व वाड्या असून केवळ पाडळी देशमुख हे महसुली गाव आहे. नाशिक मुख्यालयापासून हे गाव सुमारे २८ किमी अंतरावर व इगतपुरीपासून १९ किमी अंतरावर आहे. येथील लोकसंख्या शेती, पशुपालन या व्यवसायांवर आधारित आहे. गावात रेल्वे स्थानक असल्याने दळणवळणाची सुविधा उत्तम आहे. गावात ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा (इयत्ता १ ते ७), अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्वस्त धान्य दुकान आणि आपले सरकार सेवा केंद्र आदी सुविधा उपलब्ध आहेत. पाणीपुरवठ्यासाठी २ सार्वजनिक विहिरी, २ हातपंप व राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत नळ योजना कार्यरत आहे, तर जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची योजना प्रगतिपथावर आहे. गावात सौरपथदिवे १० व एकूण २५ विजेचे पोल आहेत.
पाडळी देशमुख २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| मापदंड | माहिती |
|---|---|
| गावाचे नाव | पाडळी देशमुख |
| तालुका | इगतपुरी |
| जिल्हा | नाशिक |
| स्थापना | १९६६ |
| महसुली गावे | १ (पाडळी देशमुख) |
| पाड्या व वाड्या | ४ |
| जि.प. गटाचे नाव | इगतपुरी |
| पंचायत समिती गणाचे नाव | खंबाळे |
| एल.जी.डी. कोड | ५२९७७५ |
| अक्षांश-रेखांश | १९.८०१३६८N, ७३.६७५८९६E |
| नाशिकपासून अंतर | २८ कि.मी. |
| इगतपुरीपासून अंतर | १९ कि.मी. |
| शाळा | जि.प. शाळा (१ ते ७ वी) |
| अंगणवाडी केंद्र | १ |
| प्राथमिक आरोग्य उपकेंद्र | १ |
| सौर पथदिवे | १० |
| महिला स्वयंसहाय्य गट | १४ |
| जल जीवन मिशन योजना | प्रगतीपथावर |
| आपले सरकार सेवा केंद्र | १ |
| स्वस्त धान्य दुकान | १ |
| विकासकामे | गटार, पाणी योजना, रस्ते, स्ट्रीट लाईट, स्मशानभूमी शेड, सभागृह |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |